- ॲक्टिव्ह रुग्णांनी ओलांडला 74 हजारांचा टप्पा
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक बनत चालली आहे. प्रदेशात मागील 24 तासात कोरोनामुळे 122 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 7 हजार 127 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. प्रदेशात ॲक्टीव्ह रुग्ण संख्येने 78 हजारचा टप्पा पार केला आहे. तर काल 5 हजार 748 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 71 हजार 810 इतकी झाली आहे. यातील 1 लाख 84 हजार 207 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात 21, 581 नमुने निगेटिव्ह आले आहेत. काल देहरादून जिल्ह्यात 2094 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उधमसिंह नगर 691, हरिद्वारमध्ये 1354, नैनिताल 587, उत्तरकाशीमध्ये 317, पौडीमध्ये 361, टिहरी 508, अल्मोडा 210, रुद्रप्रयाग 304, चमोली 297, चंपावत 177, पिथोरागडमध्येे 156 आणि बागेश्वर जिल्ह्यात 71 रुग्ण आढळून आले आहेत.
प्रदेशात आतापर्यंत 4245 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत प्रदेशात 78,304 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर संसर्गाचा दर 6.51 आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67.77 % इतके आहे.