प्रेग्नंसीच्या प्रश्नावर विद्या बालन संतप्त
बॉलिवूडमधील अभिनय निपुण अभिनेत्री म्हणून विद्या बालनला ओळखले जाते. स्वतःच्या दमदार अभिनयाच्या बळावर तिने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात काळात विद्याला तिच्या वजनावरून ट्रोल करण्यात आले होते, पण अशा टीकाकारांना तिने स्वतःच्या अभिनयातून उत्तर दिले आहे. बिनधास्त स्वभाव आणि बेधडक विधानांसाठी ओळखल्या जाणाऱया विद्याने एका मुलाखतीत वैवाहिक आयुष्याबद्दलही मन मोकळे केले आहे.
विद्याने प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरशी विवाह केल्यावर तिच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची चाहत्यांची उत्सुकता वाढली. याचमुळे विद्याला नेहमीच खासगी आयुष्यासंबंधी प्रश्न विचारले जातात.
प्रेग्नंसीवर सातत्याने विचारण्यात येणाऱया प्रश्नांवर विद्या अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भडकली. मी मुलांना जन्म देणारी मशीन नाही. विवाहानंतर वाढलेले वजन आणि अन्य काही कारणांमुळे मी डॉक्टरकडे जात होते, पण याचा अर्थ मी गरोदर आहे असा होत नाही. आपल्या देशात विवाह झाला की मुलं जन्माला घालण्यासंबंधी अपेक्षांचे ओझे महिलांवर नेहमीच लादण्यात येते, हा केवळ मूर्खपणा असल्याचे विद्याने म्हटले आहे.