आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश
प्रतिनिधी / मालवण:
मालवण ग्रामीण रुग्णालयानजीक असलेल्या नगरपालिकेच्या जागेत लवकरच 20 ऑक्सिजन बेड कोविड केअर सेंटर तयार केले जाणार आहे. यादृष्टीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व डॉ. बालाजी पाटील यांच्यासोबत नगरपालिकेच्या जागेची पाहणीही केली. आमदार वैभव नाईक यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयला भेट देऊन याबाबत तात्काळ आदेश काढण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना केली होती. याप्रमाणे केलेल्या मागणीनुसार मालवण ग्रामीण रुग्णालयानजीकच्या जागेत 20 ऑक्सिजन बेड कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून याठिकाणी 50 ऑक्सिजन सिलिंडर, 10 कॉन्सन्टेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्हय़ात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, आमदार नाईक यांनी मालवण तालुक्मयाकरिता ग्रामीण रुग्णालयानजीक असलेल्या जागेत ऑक्सिजन बेड असलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी केली होती. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनाही याबाबत बैठक घेऊन तात्काळ कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सकांनी 20 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत तसेच याठिकाणी 50 ऑक्सिजन सिलिंडर, 10 कान्सन्टेटर उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत.