सावंतवाडी / प्रतिनिधी:-
कॉन्फेडरेशन्स ऑफ रियल इस्टेट असोसिएशन्स ऑफ इंडिया म्हणजेच क्रीडाई ही एक देशपातळीवरची रियल इस्टेट डेव्हलपर्स अँड बिल्डर्स यांची एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेचा एक भाग म्हणून क्रीडाई सावंतवाडी येथे काम करते. या संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाईन सभेमध्येमध्ये नीरज मोहन देसाई यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच शरद सावंत यांची उपाध्यक्षपदी गोविंद खुर्जेकर यांची सचिव पदी आणि यशवंत नाईक यांची खजिनदार पदी पदी निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सदस्य दिनेश नागवेकर सर यांनी जुनी कार्यकारणी कायम ठेवण्याकरिता प्रस्ताव मांडला. सध्याच्या कार्यकारणीच्या काळ हा सन २०२१ ते २०२३ असा असेल.