प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर जिह्यात कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक प्रादूर्भाव होवू शकतो, असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. आता आम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करत आहोत, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सोमवारी सांगितले.
सोलापूर शहर आणि जिह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख सोलापुरात आले होते. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेवून तिसऱया लाटेच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, `सोलापूर शहर आणि जिह्यात बालरोग तज्ञांची समिती स्थापन केली आहे. उपचारासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, औषधे याची तयारी केली आहे. लसीकरणालाही गती देण्यात आली आहे मात्र लसीचा पुरवठा म्हणावा तसा होत नाही. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुसऱया लाटेत लसीकरण पूर्ण झाले असते तर तिसऱया लाटेचे संकट टाळता आले असते.’
वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. म्युकरमोयकोसिस नियंत्रणासाठीही प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्क वापरणे कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे आवाहनही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना देण्यासाठी लस उपलब्ध होत नाही. लसीचा साठा उपलब्ध व्हावा यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत, असेही देशमुख यांनी सांगितले.
कोरोना नियंत्रणासाठी देशात महाराष्ट्रात सुरु असलेले काम चांगले आहे. पहिल्या आणि दुसऱया लाटेत आपण सर्वांनी लढा दिला आहे. नियमांचे पालन केले तर तिसऱया लाटेचे संकट येणार नाही. – अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री