वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट
येत्या गुरूवारपासून विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी विंडीजने 17 जणांचा संघ जाहीर केला असून त्रिनिदाद-टोबॅगोचा नवोदित वेगवान गोलंदाज जेडेन सिलेसचा संघात समावेश केला आहे.
विंडीजचा वेगवान गोलंदाज चेमार होल्डर दुखापतीमुळे या मालिकेसाठी उपलब्ध होणार नसल्याची माहिती क्रिकेट विंडीजच्या प्रवक्त्याने दिली. 19 वर्षीय नवोदित वेगवान गोलंदाज जेडेन सिलेसला पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे. सिलेसने आतापर्यंत 10 व्यावसायिक सामन्यात आपला सहभाग दर्शविला आहे. तसेच त्याने एकमेव प्रथमश्रैणी आणि सहा टी-20 सामने खेळले आहेत. विंडीज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली कसोटी 10 ते 14 जून दरम्यान, सॅमी क्रिकेट मैदानावर तर दुसरी कसोटी 18 ते 22 जून दरम्यान होणार आहे.
विंडीजचा कसोटी संघ- क्रेग बेथवेट (कर्णधार), ब्लॅकवूड, बाँनेर, डरेन ब्रॅव्हो, चेस, कॉर्नवॉल, डिसिल्वा, एस. गॅब्रियल, हॅमिल्टन, जेसन होल्डर, शाय हॉप, जोसेफ, मेयर्स, के. पॉवेल, रॉच, सिलेस आणि वॅरीकेन.