देशमुख रोड टिळकवाडी येथील प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
देशमुख रोड टिळकवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. काम पूर्णत्वाला आल्याने माती घालून पाईप बुजविल्या जात आहेत. परंतु काही ठिकाणी पाईप खुल्या आहेत. हे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही माती घातल्याने माती पाईपमध्ये अडकण्याची शक्यता आहे. याकडे कंत्राटदाराने लक्ष पुरविण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक विकासकामे केली जात आहेत. परंतु नागरिकांना विश्वासात न घेताच कामे करण्यात येत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. देशमुख रोड येथेही काम पूर्ण होण्यापूर्वीच माती घालून पाईप बुजविण्याचे प्रकार होत आहेत.
या दरम्यान जोराचा पाऊस झाल्यास सर्व माती डेनेज पाईपमध्ये अडकण्याची शक्मयता आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाईप खुले ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणचे काम पूर्ण करूनच माती घालण्याची मागणी करण्यात येत आहे.