ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील देशातील सर्वात मोठी औषध कंपनी सिरम संस्था मुलांवर नोवाव्हॅक्स लशीची चाचणी घेण्याची योजना आखत आहे. सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, संस्थेकडून जुलै महिन्यापासून नोवाव्हॅक्स लशीची चाचणी सुरू केली जावू शकते. यासोबत असे देखील सांगण्यात आले आहे की, सिरम संस्था सप्टेंबरपर्यंत अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स कोरोना लस देशात येण्याची अपेक्षा करत आहे.
दरम्यान, लस निर्मिती करणारी कंपनी नोवाव्हॅक्सने दावा केली आहे की, त्यांची लस कोरोनाच्या व्हेरिअंट विरोधात 90 टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी आहे. कंपनीने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर संशोधन केल्यानंतर लस प्रभावी असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, अमेरिकन कंपनी नोवाव्हॅक्स मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली होती. ज्या अंतर्गत 200 कोटी लस निर्मिती केली जाणार होती.