ईद -ए -मिलाद निमित्त फेरीचे आयोजन
सावंतवाडी शहरातून आज सकाळी ११ वाजता मुस्लिम बांधवांची ईद -ए -मिलाद निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली . खरेतर यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद -ए – मिलाद हे उत्सव काल एकाच दिवशी साजरे करण्यात आले . दोन्ही धर्मियांचे सण एकाच दिवशी आल्यामुळे आणि काल अनंत चतुर्दशी दिवशी सार्वजनिक गणपतींचे विसर्जन असल्या कारणाने गर्दी होऊ नये तसेच समाजात शांतता आणि सलोखा कायम राहण्याच्या हेतूने मुस्लिम बांधवानी आज फेरीचे आयोजन केले होते .