प्रतिनिधी/ बेळगाव
श्री ज्योतिर्लिंग देवस्थान वाडी रत्नागिरी, कोल्हापूर येथे दवणा पौर्णिमा दि. 4 एप्रिल रोजी होणार आहे. दि. 5 रोजी रात्री पालखी सोहळा होणार आहे. सालाबादप्रमाणे नार्वेकर गल्ली, बेळगाव येथून पायी जाणारे भक्त पालखी व बैलगाड्यांसह दि. 27 मार्च रोजी दुपारी 4 वाजता ज्योतिर्लिंग देवस्थान, नार्वेकर गल्ली येथून निघणार आहेत.
तसेच हेब्बाळ, संकेश्वर, निपाणी, कागल, कोल्हापूर येथे वस्ती करून दि. 1 एप्रिल रोजी ज्योतिबा डोंगरावर पोहोचणार आहेत. दवणा व पालखी सोहळा करून दि. 10 रोजी कोल्हापूर सर्कल बेळगाव येथे आंबिल व घुगऱ्यांची यात्रा करून पालखी नार्वेकर गल्ली, बेळगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात पोहोचेल, असे देवस्थानतर्फे दादा अष्टेकर भक्त मंडळाने कळविले आहे.