दीपचे अर्धशतक, दर्शनच्या 7 विकेट्स
क्रीडा /प्रतिनिधी
मडगाव
गोवा क्रिकेट संघटनेच्या गोवा प्रीमियर लीग (जीपीएल) तीन दिवशीय अंतिम लढतीचा पहिला दिवस फिरकी गोलंदाजांनी गाजविला. पर्वरी क्रिकेट अकादमीवरील ‘टर्नर’वर पहिल्या दिवशी 15 विकेट्स पडल्या. प्रथम धेंपो क्रिकेट क्लबचा पहिला डाव 157 धावानी गुंडाळल्यानंतर एमसीसीने आपल्या डावात दिवशीअखेर 5 बाद 135 धावा केल्या होत्या. पहिल्या डावात आघाडीपासून आता एमसीसी 23 धावानी पिछाडीवर असून त्यांच्या 5 विकेट्स शिल्लक आहेत.
धेंपो क्रिकेट क्लबसाठी पहिल्या डावात दीप कसवणकरने (नाबाद 50 धावा, 78 चेंडू, 5×4) अर्धशतकी नाबाद खेळी केली. 7 बाद 81 अशा बिकट स्थितीनंतर नवव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या दीपने लक्षय गर्ग (23 धावा) समवेत आठव्या विकेटसाठी उपयुक्त 59 धावा जोडल्या व संघाला दिडशेच्या पार नेले. एमसीसीचा कप्तान दर्शन मिसाळने आपल्या फिरकीची कमाल दाखविताना 46 धावात 7 गडी बाद केले. याव्यतिरिक्त किथ पिंटोने 2 गडी बाद केले.
खेळ संपला तेव्हा एमसीसीने आपल्या पहिल्या डावात 5 बाद 135 धावा केल्या होत्या. यावेळी पियुष यादव व दर्शन मिसाळ अनुक्रमे 38 व 12 धावावर खेळत होते. धेंपो क्रिकेट क्लबसाठी विकास सिंग व रोहन बोगाटीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. संक्षिप्त धावफलक: धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव 53.5 षटकात सर्वबाद 157 (करण वशोदिया 9, यश पोरोब 10, अभिनव तेज राणा 12, मंथन खुटकर 2, सोहम पनवलकर 9, वासू तिवारी 7, विकास सिंग 22, लक्षय गर्ग 23, दीप कसवणकर नाबाद 50, रोहन बोगाटी 2, फरदीन खान 0 धाव. गोलंदाजी: हेरंब परब 5-0-15-0, दर्शन मिसाळ 25-6-46-7, किथ पिंटो 21.5-2-78-2, वेदांत नाईक 2-0-7-1), एमसीसी, पहिला डाव 40 षटकात 5 बाद 135 (सुमीरन आमोणकर 2, प्रथमेश गावस 10, शांतनू नेवगी 20, शौर्य जगलान 27, पियुष यादव नाबाद 38, किथ पिंटो 5, दर्शन मिसाळ नाबाद 12 धावा. गोलंदाजी: विकास सिंग 19-2-49-2, रोहन बोगाटी 14-2-45-2, यश पोरोब 2-0-17-1).