आणखी संशयित लपल्याच्या संशयाने दिवसभर शोधमोहीम
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिह्यात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. गुप्तचर विभागाकडून दसल भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी नाकाबंदी करून शोधमोहीम सुरू केली. सुरुवातीच्या टप्प्यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर आणखी काही दहशतवादी लपून बसल्याच्या संशयाने शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत अतिरिक्त सुरक्षा फौजफाटा मागवून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. पोलिसांनी परिसराला वेढा घालत सर्वसामान्य नागरिकांच्या संचारावर आणि वाहनांच्या रहदारीवर निर्बंध घातले आहेत. यापूर्वी गुऊवारी सांबा सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांनी सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले होते. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबा (एलईटी) च्या दोन दहशतवाद्यांना अटक करत त्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. झडतीमध्ये दोन चायनीज पिस्तूल, दोन मॅगझिन आणि 15 राउंड जप्त करण्यात आले