प्रतिनिधी
लांजा
कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. या दरम्यान लांजा तालुक्यातील आगवे मोरेवाडी मधील सुरेश घडशी यांच्या घरावर शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास आंब्याचे झाड कोसळले. यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुरेश घडशी हे स्वतः जखमी झाले आहेत.
या घटनेदरम्यान सुरेश घडशी यांच्यासह कुटुंबातील अन्य तीन सदस्य घरात होते. परंतु सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.