कोवाड वार्ताहर
बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथील संतोष सुरेश बच्चेनट्टी (वय २१) या तरुण यूवकाचा शेतात नांगरणी करताना विजेचा शॉक लागून मृत्यु झाला. या घटनेने कोवाड परीसरातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मयत संपत हा आपल्या शेतात बैलानी नांगरटी चे काम करत होता. त्याच शेतात विजेचा खांब असून खांबाला टेकू असलेल्या ओढणी ला नांगर लागली. नांगरीचा खालील भाग लोखंडी असल्याने संपत ला जोराचा शॉक बसला. शिक्षण घेत शेती च्या कामात सदैव शेतात धडपडत असणाऱ्या संतोषला त्या ओढणीत शॉक लागू शकतो हे पुसटशी कल्पनाही नव्हती. आणि यामुळे या तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.