आंबेवाडी येथील घटनेने खळबळ : जखमी तरुणावर खासगी इस्पितळात उपचार
प्रतिनिधी /बेळगाव
आंबेवाडी येथे एका तरुणावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. शिवारामध्ये पार्टी करत असताना ही घटना घडली असून, पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत ओमकार भीमराव मेणसे (वय 30) रा. विनायकनगर, हिंडलगा असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
दोन दिवसांपूर्वी ओमकार मेणसे आणि अभिषेक नलवडे (वय 28) यांनी कॅम्प येथे एका तरुणाला मारहाण केली होती. त्यानंतर मंगळवारी काही तऊणांनी अभिषेक याला मारबडव करून ओमकार कोठे आहे, अशी विचारणा त्या तरुणावर केली. त्यानंतर अभिषेक याने आंबेवाडी येथील प्रकाश पाटील यांच्या शेतामध्ये ओमकार पार्टी करत असल्याचे सांगितले.
त्यानंतर त्या तरुणावर आंबेवाडी येथे धाव घेऊन पार्टी करत असलेल्या ओमकार याच्यावर हल्ला केला. यामध्ये ओमकार हा गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जखमी ओमकारला काही जणांनी उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल केले.
या घटनेची माहिती काकती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्यांनी रात्री उशिराने आंबेवाडी येथे जाऊन या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. हल्ला कोणी केला, तसेच कशासाठी केला? याची विचारणा सुरू होती. हल्ला करणारे फरार झाले असून काकती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांचे सहकारी पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे आंबेवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.