पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
सावंतवाडी –
ओळख निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून मातृत्व प्रदान केल्याचा प्रकार उघड झाला . याप्रकरणी पीडितेने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ,संशयित चेतन महेश पाटील , ता- सावंतवाडी याच्याविरुद्ध भा.दं.वी कलम ३७६ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते मार्च 2023 या कालावधीत घडला. पीडित मुलीची रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पोलीस ठाण्यात संशयित चेतन पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून बुधवारी रात्री अटक करण्यात आली. अशी माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.