वार्ताहर /कामुर्ली
थिवी- कोलवाळ फट्टीर येथील जंक्शनवर झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. टॅक्सी क्रमांक जीए- 03-एन-3616 व खासगी वाहन क्रमांक एमएच-07-ए-6053 यांच्यात सकाळी 10 वा.च्या दरम्यान अपघात झाला. वाहनातील लोकांना किरकोळ इजा झाली. टॅक्सी म्हापसाहून शिरसईला तर खासगी वाहन अस्नोडामार्गे म्हापसा जात होते. अपघाताचा पंचनामा हवालदार महादेव परब यांनी केला. टॅक्सी चेतन कांदोळकर तर खासगी वाहन सुबोध कोंदरेकर चालवित होता.