शाहुवाडी प्रतिनिधी
मलकापूर ता.शाहूवाडी येथील ५५ वर्षीय संशयित आरोपी अनिल गणपती भोपळे या इसमाने २३ वर्षीय मतीमंद युवतीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी मलकापूर शहरातील युवक,युवती,महिला व नागरिकांनी निषेध रँली काढली होती . या प्रकरणी संशयीत आरोपीस अटक केल्याची माहिती शाहूवाडी पोलिसांतून देण्यात आली.
गुन्हा नोंद होऊन ही गेल्या चार दिवसात मतीमंद युवतीशी गैर संबंध ठेऊन तिला गर्भवती केल्याचे निष्पन्न झाले असताना.पोलिसांनी आरोपीस अटक न केल्याच्या निषेधार्थ मलकापूरवासियांनी मलकापूरातील सर्व व्यवहार बंद ठेऊन निषेध रँली काढली होती.यावेळी पोलिस निरिक्षक राजेंद्र सावत्रे यांच्याकडे शहरातील महिलांनी संबंधित आरोपीस अटक करून कठोर शिक्षा करावी.अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती. संतप्त मलकापूरवासियांचा उद्रेक लक्षात घेऊन आज शाहूवाडी पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे.उद्या त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांतून सांगण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्रध्दा आंबले करीत आहेत.