मडगाव : अमली पदार्थ प्रकरणाच्या एका खटल्यात मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी सावनूर-हावेरी, कर्नाटक येथील धर्मण्णा चव्हाण (36) याला 6 महिने सश्रम कारासावाची शिक्षा ठोठावली. मडगावच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश पूजा कवळेकर यांच्या न्यायालयाने या आरोपीला ही शिक्षा ठोठावली. मडगावचे अॅङ पियेश मडकईकर यांची भारत सरकारच्या नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने या प्रकरणी खास सरकारी वकील म्हणून नियुक्त केले होते. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या आरोपपत्रानुसार वासवाडो -बाणावली येथील एगी गेस्ट हावसमध्ये आरोपी धर्मण्णा चव्हाण राहात असून त्याच्याकडे अमली पदार्थचा साठा असल्याची माहिती नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या गुप्तचरांना मिळाली हाती. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि त्याच्याव्कडून धाड घलण्यासाठीची परवानगी घ्ग्sण्यात आली आणि आरोपी राहात असलेल्या बाणावली येथील जागेत धाड घालण्यात आली.
आरोपी राहात असलेल्या खोलीची झडटी घेण्यात आली तेव्हा अमली पदार्थसारखा पदार्थ सापडला. तेथेच या पदार्थाची चाचणी करण्यात आली तेव्हा तो पदार्थ गांजा आणि चरस असल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या गांजा आणि चरसचे वजन जवळ जवळ 1 किलो इतके होते असे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात म्हटलेले आहे. खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरु झाली आणि न्यायालयाने आरोपीवर असलेला आरोप कथन केला तेव्हा हे आरोप आपल्याला मान्य नसल्याचे आरोपीने न्यायालयाला सांगितले. त्याप्रमाणे नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने खास सरकारी वकील पी. मडकईकर यांच्यामार्फत न्यायालयात पुरावे सादर केलेत तसेच प्रभावी युक्तिवाद केला. 2 फेब्रुवारी 2018 रोजी 497 ग्रॅम गांजा आणि 496 ग्रॅम चरस आरोपीच्या बाणावली येथील खोलीतून जप्त करण्यात आला हे सरकारपक्षाने न्यायालयात सिद्ध केल्याचे न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या आदेशात म्हटलेले आहे. अमली पदार्थ कायद्याच्या 20 (ब) (2- (अ) कलमाखाली या आरोपीला न्यायालयाने 10 हजार रुपये दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास 1 महिना कैदेची शिक्षा ठोठावली. याच कायद्याच्या 20 (ब) (2- (ब) कलमाखाली आरोपीला दोषी ठरविण्यात आले असून 6 महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास एक महिन्याची कैदेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.