नॉर्वेकडून युक्रेनला मोठी मदत : डेन्मार्क पुरविणार शस्त्रास्त्र
रशिया अन् युक्रेन युद्धादरम्यान अमेरिकेसोबतच युरोपीय देश देखील युक्रेनच्या मदतीसाठी उघडपणे सरसावले आहेत. नॉर्वेने युक्रेनला विमानभेदी क्षेपणास्त्र यंत्रणा पुरविली आहे. तर डेन्मार्क देखील मोठय़ा संख्येत युक्रेनला शस्त्रास्त्रs पुरविण्याची योजना आखत आहे.
डेन्मार्क युक्रेनला अनेक चिलखती वाहने आणि तोफगोळे पुरविणार आहे. युक्रेनला 25 पिरान्हा-3 चिलखती वाहने, 50 एम-113 चिलखती वाहने आणि एम-10 तोफगोळय़ांसह हजारोंच्या संख्येत शस्त्रास्त्रs डेन्मार्ककडून युक्रेनला देण्यात येणर आहेत.
नॉर्वेचे संरक्षण मंत्री ब्योर्न एरिल ग्रॅम यांच्यानुसार मिस्ट्रल अँटी एअरक्राफ्ट मिसाइल सिस्टीम अत्यंत उपयुक्त अस्त्र आहे. याच्याद्वारे 3 किलोमीटरपर्यंत कमी उंचीवर असलेली विमाने आणि हेलिकॉप्टरना पाडविले जाऊ शकते. क्रूझ क्षेपणास्त्रs नष्ट करण्याचीही या यंत्रणेत क्षमता आहे.
रशिया-युक्रेन युद्धात यापूर्वीच नागरी वापराच्या ड्रोनचा वापर होत असल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने स्वतःच्या नागरिकांना एका पोस्टद्वारे कमर्शियल ड्रोनचा वापर करत रशियाच्या सैन्याच्या हालचाली जाणून घेण्याचे आवाहन केले होते.