रशियाने गमावला कब्जा
रशियाचा डोनबास भागावरील हल्ला यशस्वी ठरला नसल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. अमेरिकेने 12 विमानांद्वारे शस्त्रास्त्रs पाठवून युक्रेनचे बळ वाढविले आहे. तर रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे विजय दिनी युक्रेनवर चहुबाजूने युद्ध करण्याची घोषणा करू शकतात. कीव्हवर कब्जा करण्यास अपयशी ठरलेल्या रशियाच्या सैन्याच्या लाजिरवाण्या कामगिरीचा सूड घेण्यासाठी पुतीन हे अधिकृतपणे युक्रेनविरोधात 9 मे रोजी युद्धाची घोषणा करू शकतात असा इशारा अधिकाऱयांनी दिला आहे.
खारकीव्ह क्षेत्रातील 4 गावांवर पुन्हा नियंत्रण मिळविल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. रशियाचे सैन्य पूर्व युक्रेनच्या विशाल क्षेत्रांवर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्याच्या योजनेत अपयशी ठरले आहे. डोनबासच्या पूर्व भागावर लक्ष केंद्रीत करून देखली रशिया अद्याप मनोबल आणि रसद पुरवठय़ाच्या समस्येला तोंड देत आहे.
रशियाच्या कब्जात असलेल्या शहरात लूट होत आहे. रशियन सैनिक व्हेंटिलेटर आणि अन्य वैद्यकीय उपकरणे चोरून रशियात नेत असल्याचा आरोप मारियुपोल शहराच्या महापौरांचे सल्लागार पेट्रो एंड्रीशचेंको यांनी केला आहे. तर रशियाच्या कब्जातील खेरसॉन ओब्लास्टमध्ये रशियन हस्तकांनी नोवा काखोवकामध्ये ब्लादिमीर लेनिनचा पुतळा उभा केला आहे.
युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा
लोकांची हत्या मॉस्कोच्या प्लेबुकमध्ये होत असल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी केला आहे. चर्चा अपयशी ठरण्याची आशंका पूर्वीपासूनच होती असेही त्यांनी म्हटले आहे. याचदरम्यान पाश्चिमात्य देशांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्रास्त्रs पुरविण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.
रशियाचे हल्ले सुरूच
पूर्व युक्रेनमध्ये रशियाकडून क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत. ओडेशा शहरातील एका धावपट्टीवर हल्ला झाल्याने त्याचा आता वापर करता येणार नसल्याचे युक्रेनच्या नेत्यांनी सांगितले. तर युक्रेनच्या 17 सैन्यतळांवर हल्ले केले असून यात 200 हून अधिक युक्रेनियन ठार झाल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
शाळा अन् रुग्णालये उद्ध्वस्त
रशियाच्या सैनिकांनी मागील 24 तासांमध्ये 12 नागरी वस्त्यांना लक्ष्य करत गोळीबार केला. या हल्ल्यात एक शाळा अन् एका रुग्णालयासह 36 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. कीव्हच्या विविध भागांमध्ये झालेल्या या गोळीबारात अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. रशियाच्या सैनिकांनी लोकांचा छळ करत त्यांना गोळय़ा घातल्या आहेत. 3 पुरुषांचे मृतदेह ओब्लास्टच्या बुकान्स्की जिल्हय़ाच्या जंगलात आढळून आल्याची माहिती ओब्लास्टचे पोलीस प्रमुख एंड्री नेब्योतोव्ह यांनी दिली आहे.