सातारा प्रतिनिधी
साताऱ्यात पोवई नाका या ठिकाणी गांधी जयंतीच औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. स्वच्छता आठवड्याचा नियोजन करण्यात आला असून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.. यावेळी आदित्य ठाकरेंनी वाघनख्यांबाबत उपस्थित केलेले प्रश्न हा राजकीय विषय आहे. त्यांच्याकडून मुद्दाम प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जर इंग्लंडहून आणण्यात येणारी वाघनखे ही खरी नाहीत तर आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखे खोटी आहेत हे सिद्ध करावे असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आदित्य ठाकरे यांना केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जात आहेत.या वाघनखांवरुन आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात येत असलेली वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी केली होती यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ठाकरेंना आवाहन केलं आहे.