मिरवणूकीत बहुसंख्य मुस्लिम बांधवांचा सहभाग,तरूणाकडून मिठाई वाटप
नांद्रे प्रतिनिधी
नांद्रे येथे पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा अनंतचतुर्दशी मुळे पैगंबर जयंतीची मिरवणूक रविवारी काढण्यात आली.यावेळी हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.
यंदा अनंत चतुर्दशी व पैगंबर जयंती एकाच दिवशी आल्याने नांद्रेयातील मुसलीम बांधवानी अनंत चतुर्दशी दिवशी पैगंबर जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेतला होता.रविवारी पैगंबर जयंतीनिमित्य मुस्लीम बांधवानी हजरत खाँजा कबीर यांच्या दरबारात खतम,सलाम,दुवा करून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढली.या मिरवणूकीत पारंपारिक वेशभूषा केलेले घोडे,हिरवे झेंडे घेतलेले तरूण,लहान मुले,मुली,सहभागी झाल्या होत्या.सजवलेल्या कार,जिप,टेम्पोसह अन्य वाहनेही या मिरवणूकीत सहभागी होते.
पैगंबर जयंती निमित्य मुल्ला मशीदीत विद्युत रोषणाई करून, प्रवचन,व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुल्ला मोहल्यामध्ये महाप्रसादाचे व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मुल्ला गल्ली ते श्रीमंती आण्णासो पाटील हायस्कूल परिसरात विविध कमानी,पताके,मंडप,विद्युत रोषणाई करण्यात आली होती.कार्यक्रमाची सांगता पाटील मळ्यातील मंडपात ऊर्दू शाळेच्या मुला- मुलीच्या,नात,सलाम,प्रवचन,बयान करत करण्यात आली.या वेळी मुसलीम बांधवांनी एकमेकांना भेटून पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.