काबूल : ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया आयसीसी 2022 सालातील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अफगाण क्रिकेट मंडळाने गुरुवारी 15 जणांचा संघ जाहीर केला असून मोहम्मद नबीकडे नेतृत्व सोपविले आहे.
अलीकडेच झालेल्या 2022 च्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणचे कर्णधारपद मोहम्मद नबीकडे होते. अफगाणच्या निवड समितीने ऑस्ट्रेलियातील या आगामी स्पर्धेसाठी पुन्हा एकदा नबीकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.
अफगाण संघ- मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल झेद्रान (उपकर्णधार), आर. गुरुबाज, अझमतुल्ला ओमरझाई, डी. रसुली, फरिद अहमद मलिक, फझल हक फरुकी, हजरततुल्ला झेजाई, इब्राहिम झेद्रान, मुजीबूर रेहमान, नवीनउल हक, कयास अहमद, रशिद खान, सलीम शफी आणि उस्मान घनी, राखीव- अफसर झेजाई, एस. अश्रफ, रेहमत शहा आणि गुलबदीन नईब.