Agitation of Nigude villagers against overloaded mineral transport
काल सकाळी ०९:०० वाजले पासून निगुडे सरपंच समीर गावडे यांच्या नेतृत्वाखाली ओव्हरलोड खनिज वाहतुकी विरोधात निगुडे ग्रामस्थ यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत होता सरपंच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, यांनी फोन द्वारे पाठिंबा दर्शवला तसेच सावंतवाडी सरपंच संघटनेनेही जाहीर पाठिंबा दिला .
यावेळी निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे, निगुडे माजी सरपंच श्री शांताराम गावडे, शेरले सरपंच उदय धुरी, माजी सरपंच दयानंद धुरी, निगुडे माजी उपसरपंच शिवा सावळ, निगुडे तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण निगुडकर, राजेश मयेकर, किशोर जाधव, वसंत जाधव, महेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी दळवी, ईशा तुळसकर, पाडलोस सोसायटीचे उपाध्यक्ष विश्वनाथ नाईक, पत्रकार प्रवीण परब, दक्षता गावडे, अंकिता महाले, सुभाष देसाई, आनंद गावडे, शुभदा सावंत, संकेत गावडे, लवु नाईक, उमेश गावडे, पंढरीनाथ राणे, अभिमन्यू गावकर, पुरुषोत्तम गावडे, योगेश केणी, चंद्रकांत जाधव, रोणापाल उपसरपंच भिकाजी केणी, सत्यवान राणे, संदीप नाईक, शंकर सावंत, आदी १०० ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी