‘त्या’ नाल्यावर पूल बांधण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
चिकोडी तालुक्तील मुगळी ग्राम पंचायतीच्या अखत्यारित असोदे म्हणून लहान वसाहत येते. त्या वसाहतीकडे ग्राम पंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या वसाहतीमध्ये 30 हून अधिक कुटुंबे आहेत. विद्यार्थीही मोठय़ा संख्येने आहेत. त्यांना पावसाळय़ात गावाकडे येणे अवघड झाले आहे. तेव्हा असोदे वसाहतीतील जोडणारा रस्ता करावा, अशी मागणी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्यावतीने जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
असोदे वसाहतीला लागूनच एक नाला आहे. त्या नाल्यामध्ये नेहमी पाणी असते. तो ओलंडणे अशक्मय झाले आहे. नाल्यावर पूल नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. लहान मुलांना तसेच विद्यार्थ्यांना ये-जा करणे कठीण झाले आहे. गर्भवती महिलांनाही मोठी समस्या निर्माण होत आहे. तेव्हा तातडीने पुलाची बांधणी करुन रस्ता करावा, असे या निवेदनात म्हटले आहे. रस्ता केला नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी रवी बस्तवाडकर, सिदराय मेत्री, दुर्गाप्पा चलवादी, रामू कांबळे, विनायक कोलकार, परशराम कांबळे, निंगाप्पा कांबळे यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.