सावंतवाडी / प्रतिनिधी
महिला बाल विकास विभागातर्फे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार कलंबिस्त येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाच्या संचालिका, माजी ग्रामपंचायत सदस्य क्रांती ग्राम संघ अध्यक्ष सौ. मिनल महादेव जंगम यांना बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रमाणपत्र देऊन पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण कलंबिस्त ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सौ सेजल सावंत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक भाऊसाहेब फुंदे, कविता जाधव , अंगणवाडी सेविका सौ. पवार आदी उपस्थित होते. सौ जंगम यांनी कोरोना काळात उत्कृष्ट असे काम केले आहे तसेच महिला बचत गट चळवळ वाढवण्याच्या दृष्टीने गावात त्यांचे मोलाचे सहकार्य झाले. तरुण भारतचे वृत्तपत्र एजन्ट यांच्या त्या सौभाग्यवती आहेत .त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.सरपंच सौ सपना सावंत ,ग्रामसेवक श्रीबापूसाहेब फुंदे .अंगणवाडी सेविका सौ मनिषा बिड्ये,सौ वंदना पास्ते,सौ स्नेहा पवार, कु चैताली राऊळ ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारीवृंद आदी उपस्थित होते .