वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवाई क्षेत्रात कार्यरत स्पाइसजेट लिमिटेड यांनी गुरुवारी प्रवास भाडय़ात जवळपास 15 टक्क्यांची वाढ करण्याची घोषणा केली. एव्हिएशन टरबाईन फ्यूलच्या (एटीएफ) किमती सलगपणे वाढत राहिल्याने आणि रुपयाची स्थिती घसरणीत राहील्यामुळे सदरचा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले जात आहे. जून 2021नंतर आतापर्यंत एटीएफमध्ये जवळपास 120 टक्क्यांपेक्षा अधिकची वाढ केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थिती नकारात्मक होत ती 78 च्या वर पोहोचली आहे.
एटीएफच्या किमती उच्चांकी पातळीवर
16 जून रोजी झालेल्या वाढीनंतर दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या सारख्या महानगरांमध्ये एटीएफच्या किमती आतापर्यंत उच्चांकी पातळीवर राहिल्या आहेत.
आंरराष्ट्रीय पातळीवर देशातील एअरलाईन्ससाठी दिल्लीमध्ये जेट फ्यूलच्या किमती 1,372.71 डॉलर प्रति किलोलिटर, कोलकाता 1,412 डॉलर प्रति किलोलिटर, मुंबईत 1,369.12 डॉलर प्रति किलोलिटर आणि चेन्नई येथे 1,367.56 डॉलर प्रति किलोलिटर अशा राहिल्या आहेत. इंडिगोचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांनी एटीएफला जीएसटीच्या अंतर्गत आणण्याची चर्चा होती. यासोबतच आम्ही एटीएफला जीएसटीच्या अंतर्गत पातळीवर येण्यासाठी सरकारसोबत चर्चा सुरु असल्याचेही म्हटले आहे. कारण यामध्ये इनपुट कर क्रेडिटचा लाभ मिळत असल्याचे म्हटले आहे.