गॅल गडोटसोबतचे छायाचित्र केले शेअर
आलिया भट्टने स्वतःचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर गॅल गडोट आणि अन्य सदस्यांसोबतची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. तसेच गॅलने देखील आलियासोबतचा सेल्फी रीपोस्ट केला आहे. नेटफ्लिक्सच्या चित्रपटात आलिया, गॅल आणि जेमी डोर्नन हे कलाकार दिसून येणार आहेत.
हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट माझ्या मनात स्थान मिळवून आहे. सुंदर गॅल गडोट आणि माझे दिग्दर्शक टॉम हार्पर यांचे आभार. जेमी डोर्नन यांची आठवण येते. आता केवळ चित्रपट पाहण्यासाठी प्रतीक्षा करतेय. आता मी घरी जात आहे असे आलियाने नमूद केले आहे. आलिया मुंबईत दाखल झाली आहे.
छायाचित्रामध्ये आलिया समुद्रकिनारी गॅलसोबत दिसून येते. तर दुसऱया छायाचित्रात ती चित्रपटाच्या सेटवरील सदस्यांसोबत दिसून येत आहे. तसेच आलियाच्या पोस्टवर कॉमेंट करत गॅलने ‘आम्ही तुला मिस करत आहोत’ असे म्हटले आहे. आलिया गुणवान कलाकार असण्यासह एक उत्तम व्यक्ती देखील असल्याचे गॅलने नमूद केले आहे.
टॉम हार्परचा चित्रपट नेटफ्लिक्ससाठी एक नवी स्पाय प्रेंचाइजी ठरू शकते. चित्रपट यशस्वी ठरल्यास याच्या सीक्वेलमध्ये देखील आलिया दिसून येऊ शकते. आलिया, रणवीर कपूरसोबत ‘ब्ा्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनापूर्वी प्रमोशनल कार्यक्रमात भाग घेणार आहे. तर अभिनेता रणवीर सिंहसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून ती झळकणार आहे. तसेच डार्लिंग या चित्रपटाची आलिया स्वतः निर्मिती करत आहे.