7 महिन्यांपासून सुरू आहेत प्रेमाच्या आणाभाका
काई पो चे, सुल्तान, गोल्ड यासारख्या चित्रपटांमधून स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता अमित साध सध्या स्वतःच्या लव्ह लाइफवरून चर्चेत आहे. अमित साध हा ब्रिटिश अभिनेत्री विवियन मोनोरीला डेट करत आहे. दोघांचे हे रिलेशनशिप सात महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. दोघे परस्परांबद्दल अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोघेही स्वतःच्या या नव्या नात्याला जाहीर पुष्टी देऊ इच्छित नाहीत. दोघेही परस्परांना अनेकदा भेटत असतात. अमित हा स्वतःच्या प्रेयसीला भेटण्यासाठी विदेशी प्रवास करत असतो. तर विवियन देखील भारतात आली होती आणि तिने अमितसोबत देशातील प्रत्येक भागाला भेट दिली आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये हे जोडपे ट्रिपवर गेले होते. तर अमितने विवियनचा 26 वा जन्मदिन साजरा करण्यासाठी ब्रिटनमध्ये धाव घेतली होती. अमित आणि विवियन दोघेही बाइकलव्हर्स आहेत.
अमित साधने टीव्ही मालिकांमधून स्वतःच्या कारकीर्दीस प्रारंभ केला होता. तो प्रथम ‘क्यों होता है प्यार’मध्ये दिसून आला होता. त्यानंतर बिग बॉस सीझन 1 आणि अन्य टीव्ही शोजमध्ये त्याने भाग घेतला होता. ‘फुंक 2’द्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर काई पो चे, गुड्डू रंगीला, सुल्तान, अकीरा, सात कदम, सरकार 3, गोल्ड सुपर 3, शंकुतला देवी यासारख्या चित्रपटांमधील स्वतःच्या अभिनयाद्वारे त्याने लोकांची मने जिंकली होती. तर विवियन मोनोरी ही अभिनेत्री तसेच निर्माती आहे. तिला ऑर्डिनरी लव्ह, द ड्रामा सेशन्स, द पासिंगसाठी ओळखले जाते.