ऑनलाईन टीम / तरुण भारत :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट 6.50 टक्क्यांवर पोहचला आहे. दरम्यान, रेपो रेटमध्ये झालेल्या वाढीमुळे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचा EMI वाढणार आहे.
आरबीआयने आज पतधोरण जाहीर केले. त्यानंतर बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले, पतधोरणासंदर्भात झालेल्या बैठकीत सहापैकी चार जणांनी बैठकीमध्ये रेपो रेट वाढवण्याच्या बाजूने मत दिलं आहे. त्यामुळे रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये मे महिन्यापासून ही सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. MSF दर 6.5 वरुन वाढून 6.75 वर तर SDF दर 6 टक्क्यांवरुन वाढून 6.25 टक्क्यांवर पोहचला आहे.
दरम्यान, रेपो रेट वाढीवर गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा म्हणाले, आरबीआयकडून करण्यात आलेली 25 बीपीएसची वाढ हे यामध्ये लवचिकता आणण्याचे संकेत आहेत. व्याजदरात झालेल्या वाढीमुळे संभाव्य घर खरेदीदारांच्या एकूण कर्ज पात्रतेवर परिणाम झाला आहे. मात्र हा परिणाम कमी झालाआहे, कारण गेल्या 5 ते 7 वर्षांत घरांच्या किंमती पगाराच्या तुलनेत वाढलेल्या नाहीत. याचा एकूणच परिणाम म्हणजे परवडण्यामध्ये एकंदरीत वाढ झाली आहे, त्यापैकी एक म्हणजे भाग व्याजदर वाढीमुळे काढून घेतला जात आहे. आशा आहे की, महागाई नियंत्रणात आल्याने हे घट्ट चक्र संपेल.
अधिक वाचा : जेईई मेन २०२३ च्या सत्र १ परीक्षेचा निकाल जाहीर