प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव, वझे गल्ली येथील श्री लक्ष्मी-वेंकटेश्वर देवस्थानचा सहावा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विविध पूजाअर्चा तसेच धार्मिक कार्यक्रम यानिमित्त पार पडले. यावेळी भक्तांनी उत्तम प्रतिसाद दिला.
शनिवार दि. 4 रोजी सकाळी 6 वाजता पंचामृत अभिषेक, अलंकार पूजा व महापूजा करण्यात आली. सकाळी 8.30 वाजता नवग्रह होम व पवमान होम यानंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळी 6.30 वाजता भजनी मंडळाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रथोत्सव व पालखी सोहळा झाला.
रविवार दि. 5 रोजी सकाळी 9 वाजता श्री सत्यनारायण पूजा व आरती झाली. यावेळी ज्ये÷ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. देवस्थानला भूदान करणाऱया देणगीदारांपासून सतत पाच वर्षे विविध देणगीदार, सेवेकरी यांचा सत्कार कमिटीच्यावतीने करण्यात आला. रविवारी दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी संतोष जोशी व इतर पुरोहितांनी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. मंदिराच्या कळसाचे काम बाकी असून त्यासाठी 13 लाख रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे भक्तांनी आपल्या कुवतीनुसार आर्थिक मदत करावी, असे आवाहन कमिटीने केले. त्यावेळी काही भक्तांनी 1 लाखापासून 11 हजारपर्यंतच्या देणग्या जाहीर केल्या. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी वेंकटेश्वर सेवा संघाच्या पदाधिकाऱयांनी आणि भक्तांनी मदत केली. याबद्दल संघाचे सचिव ऍड. एम. एन. कुलकर्णी यांनी आभार मानले.