जॅक लीच अॅशेस मालिकेतून बाहेर
वृत्तसंस्था/ लंडन
अॅशेस मालिकेबाबत इंग्लंडच्या वाढत्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. दुखापतींमुळे इंग्लंडचे गोलंदाज एकापाठोपाठ एक मालिकेतून बाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत आता या यादीत जॅक लीचचे नाव जोडले गेले आहे. लीच पाठीच्या दुखण्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या अॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडने शनिवारी जाहीर केलेल्या 16 जणांच्या संघात लीचची निवड करण्यात आली आहे. सामन्याच्या आधी लीचला झालेली दुखापत ही इंग्लंडसाठी धक्का देणारी गोष्ट आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला होता. याआधी जेम्स अँडरसनही दुखापतीमुळे संघाबाहेर पडला आहे. अशा स्थितीत अॅशेसपूर्वी इंग्लंडच्या वाढत्या अडचणी हा संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. आयर्लंडविरुद्ध इंग्लंडच्या विजयादरम्यान लीचला अचानक पाठदुखीचा त्रास सुरु झाला. यादरम्यान, रविवारी स्कॅन केल्यानंतर लीचच्या फ्रॅक्चरची माहिती समोर आली. त्याला अॅशेस मालिकेतून बाहेर व्हावे लागले. इंग्लंड संघात लीचची जागा घेणाऱ्या खेळाडूचे नाव लवकरच जाहीर केले जाईल असे सांगण्यात आले आहे. अॅशेस मालिकेतील पहिला सामना दि. 16 जून रोजी एजबॅस्टन येथे खेळवला जाईल.