मुंबई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची द्वैमासिक पतधोरण समितीची बैठक आज मंगळवार 6 जूनपासून सुरु होत असून रेपो दराचा निर्णय 8 जूनला जाहीर होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान यावेळच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
मागच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल न करत अनेकांना दिलासा दिला होता. दरम्यान आजपासून सुरु होणाऱ्या बैठकीत रेपो दराबाबत चर्चा होणार असून रेपो दर जैसे थे ठेवला जाण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. मागच्या मेपासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात एकंदर 250 बेसीस पॉइंटस्ची वाढ केली आहे. सध्याचा रेपो दर हा 6.50 टक्के इतका आहे. 2 हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याच्या व एकंदर सध्याच्या परिस्थितीत बँकांकडे पुरेशा प्रमाणात रोखीवता असल्याचे सांगितले जात आहे. भारताचा जीडीपीही समाधानकारक असल्याने व्याजदर वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाणार नसल्याचेच दिसते आहे.