Supriya Sule News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मकथेच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली होती.त्यांच्या यो घोषणेनंतर राष्ट्रवादी नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, तर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची पत्रे दिली. कार्यकर्त्यांचा मान राखून अखेर शरद पवार यांनी माघार घेवून पुन्हा जोमाने काम करणार असं स्पष्ट केले. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा केली. याघोषणेनंतर शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय.तर विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चेला उधान आलं आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे.पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे.या जबाबदारी बद्दल आदरणीय पवार साहेब,पदाधिकारी,ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार अस ट्विट त्यांनी केलंय.
कोणावर कोणती जबाबदारी
सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र,पंजाब आणि हरियाणा विधानसभेचीही जबाबदारी आहे.तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गुजरात,मध्य प्रदेश आणि गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री,के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड,एस.आर.कोहली,नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.