वृत्तसंस्था/ हंदवाडा
जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथील परवेज नामक विद्यार्थी सध्या कौतुकाचा विषय बनला आहे. त्याचा एक पाय तुटलेला असतानाही तो प्रतिदिन दोन किलोमीटर चालत जाऊन शिक्षण घेतो. कायमस्वरुपी अपंगत्व असतानाही त्याची शिक्षण घेण्याची आस कायम आहे. सध्या तो नवव्या इयत्तेत असून हंदवाडा येथील सरकारी माध्यमिक शाळेत शिकत आहे. शाळेला जाण्याचा रस्ताही चांगला नाही. तरीही निर्धाराच्या बळावर त्याने आतापर्यंतचे शिक्षण उत्तम गुण मिळवून पूर्ण केले आहे. तो गरीब घरातील असून वडिलांना त्यांची काही जमीन विकून त्याच्या शिक्षणासाठी पैसा उभा करावा लागला आहे. डॉक्टर बनण्याचे त्याचे ध्येय आहे.