इव्हेंट कंपनीच्या तक्रारीवरून न्यायालयाचा आदेश
वृत्तसंस्था/ कोलकाता
बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानबाबत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोलकात्याच्या सियालदह न्यायालयाने झरीन खानच्या नावावर अटक वॉरंट जारी केले आहे. येथील एका कंपनीने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2018 मध्ये 6 कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कोलकाता आणि उत्तर 24 परगणा येथील 6 काली पूजेच्या कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल तिच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या वतीने नारकेलडांगा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नारकेलडांगा पोलिसांनी सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे.