ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे भाजपच्या गळाला लागले आहेत. उद्या (दि.16) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
टेकवडे हे खा. सुप्रिया सुळे यांचे ते जवळचे सहकारी आहेत. मागील काही महिन्यांपासून ते पक्षातील अंतर्गत बाबींमुळे ते नाराज होते. त्यामुळे आज ना उद्या ते भाजपात प्रवेश करतील, अशी दबक्या आवाजात चर्चा होतीच. अखेर टेकवडे यांनी भाजप प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात मी व माझा मुलगा अजिंक्य टेकवडे भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीत पवार कुटुंबाला तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मिशन बारामतीसाठी भाजप टेकवडे यांना पक्षात प्रवेश देत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.