डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहनिमित्त पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे आयोजिन
सावंतवाडी/प्रतिनिधी –
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रमानिमित्त सावंतवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी हायस्कुल सावंतवाडीची पाचवीची विद्यार्थीनी अस्मि प्रवीण मांजरेकर हिने प्रथम क्रमांक पटकवला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे बांदा केंद्र शाळेचा निल नितीन बांदेकर द्वितीय तर कारिवडे जि प शाळेच्या श्रीराज अ कारिवडेकर यांनी तृतीय क्रमांक पटकवला. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अस्मि हिचे सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत, स्कुल कमिटी चेअरमन डॉ दिनेश नागवेकर, सर्व पदाधिकारी, संचालक, मुख्यध्यापक जगदीश धोंड, उपमुख्याध्यपक नाईक, सॊ म्हापणकर, सर्व शिक्षक तसेच गटशिक्षणाधिकारी सौ कल्पना बोडके, शिक्षण विस्तार अधिकारी सौ साळगावकर, केंद्रप्रमुख सौ लंगवे यांनी अभिनंदन केले आहे. शाळा स्तर, केंद्र स्तर व तालुकास्तर अशी ही स्पर्धा झाली.