वृत्तसंस्था/ मुंबई
पुणे येथे 18 डिसेंबरपर्यंत होणाऱया 31 व्या किसान ऍग्री शो 2022 मध्ये न्यू हॉलंड कंपनीने त्यांच्या फार्म मेकॅनायझेशन सोल्यूशन्सच्या विविध ट्रक्टर्सच्या श्रेणी प्रदर्शित केल्या आहेत. यामध्ये बॅलर (गवत बांधण्याचे यंत्र) आणि हार्वेस्टर (कापणी यंत्र) सह ट्रक्टरचे वेगवेगळे प्रकार न्यू हॉलंड शेतकऱयांना पाहण्यासाठी ठेवले आहेत.
या प्रदर्शनात न्यू हॉलंडने कृषी क्षेत्रातील ग्राहकांसाठी 100 हून अधिक ट्रक्टरदेखील दाखल केलेत. नुकतेच बाजारात आणलेले ब्ल्यू सिरिज सिम्बा 30 कॉम्पॅक्ट ट्रक्टर प्रदर्शित केले आहेत. त्याशिवाय, न्यू हॉलंड 3032, 3230 4 डब्लू डी, 3037, 3600-2 एक्सेल, 3600, 4710 4 डब्लू डी, 3630, 5510, 5620, 3230 टीएक्स सुपर आणि 3037 टीएक्स सुपर हे अन्य ट्रक्टर्सचे मॉडेल्स्सुद्धा प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले आहेत. ऊस कापणी यंत्र (शुगरकेन हार्वेस्टर) आणि स्क्वेअर बेलर यांसारख्या कंपनी आणि पीक अवशेष व्यवस्थापन अवजारेदेखील कंपनीकडून प्रदर्शित केली आहेत.