सेन्सेक्स 879 अंकांनी प्रभावीत ः आयटीत विक्रीने निराशाजनक स्थिती
वृत्तसंस्था/ मुंबई
मागील काही दिवसांपासून अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक यांच्याकडून व्याजदरात वाढ करण्यात येणारा अंदाज गुरुवारी प्रत्यक्षपणे खरा ठरला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेमधील मंदीसदृश्य स्थिती व आयटी क्षेत्रातील विक्रीच्या प्रभावामुळे देशातील बाजारात निराशाजनक स्थिती निर्माण झाली होती. या वातावरणामध्येच बीएसई सेन्सेक्स तब्बल 879 इतक्या उच्चांकी अंकांनी गडगडल्याचे दिसून आले.
अन्य घडामोडींमध्ये आता बँक ऑफ इंग्लंड आणि युरोपीय केंद्रीय बँक यांच्याकडून कोणता निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. या बँकांकडून अर्धा टक्का व्याजदर वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स गुरुवारी 878.88 अंकांनी घसरुन निर्देशांक 1.40 टक्क्यांसोबत 61,799.03 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 245.40 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 18,414.90 वर बंद झाला आहे.
व्याजदर वाढीचा प्रभाव
गुरुवारी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह यांच्याकडून व्याजदरात जवळपास 0.50 टक्क्यांची वृद्धी करण्यात आली आहे. यासोबतच यावेळी महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी आगामी काळात आणखीन व्याजदर वाढविण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवून 4.25 ते 4.50 टक्के इतका केला असून हा दर मागील 15 वर्षांमधील उच्चांकी आहे, असे मानले जाते.
सेन्सेक्समध्ये टेक महिंद्रा, टायटन, इन्फोसिस, एचडीएफसी, आयटीसी, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस आणि भारतीय स्टेट बँक यांचे समभाग नुकसानीमध्ये राहिले असल्याची नोंद करण्यात आली आहे.