1 जानेवारी 2023 पर्यंत निर्बंध, ऑनलाईन विक्री-वितरणावरही बंदी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत 1 जानेवारी 2023 पर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्मयांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही ही घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे दिल्लीमध्ये आता फटाके बनवता येणार नाहीत, साठवले जाणार नाहीत आणि विक्रीही करता येणार नाही. दिल्लीतील प्रदुषणाच्या धोक्मयापासून लोकांना वाचवण्यासाठी गेल्यावषीप्रमाणे याही वेळी सर्व प्रकारच्या फटाक्मयांवर बंदी घालण्यात आली आहे. फटाक्मयांच्या ऑनलाईन विक्री आणि वितरणावरही बंदी असेल. प्रदूषण नियंत्रण समितीने गेल्या वषीही बंदी घालण्यात आली होती
फटाकेबंदीसंदर्भात दक्षता ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. हिवाळय़ात राजधानीतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रीय आयोगाने उचललेल्या पावलांपेक्षा सरकारनेही आतापासूनच तयारी सुरू केली आहे. राय यांनी संबंधित 30 विभागांच्या अधिकाऱयांसोबत बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्देश दिले आहे. पोलिसांसोबतच अन्य सर्व विभागांकडे वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच वायू प्रदूषण कमी करण्यासाठी योजना तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.