प्रतिनिधी
बांदा
जालना येथे मराठा आरक्षणासाठी चालू असलेल्या बेमुदत उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्याचा निषेध आज बांदा येथील पिंपळेश्वर मंदिरासमोर बांदा मराठा समाजाने केला.
यावेळी बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळू सावंत यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देण्यात आल्या. दरम्यान गुरुवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता बांदेश्वर भूमिका मंदिर येथून बांदा मराठा समाजातर्फे बाईक रॅली काढण्याचे यावेळी ठरविण्यात आले. यासाठी भूमिका देवी मंदिर येथे आज संध्याकाळी मराठा समाजाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राजाराम उर्फ बाळू सावंत, ज्ञानेश्वर सावंत, गुरु सावंत, स्वप्निल सावंत, साई सावंत, मिलिंद सावंत, परिमल सावंत, सागर सावंत, मकरंद तोरस्कर, राकेश परब, दीपक सावंत, संतोष माजगावकर, सुनील माजगावकर, सचिन आईर, राजाराम सावंत, सर्वेश मुळ्ये, निलेश पटेकर, जय पटेकर, शामसुंदर धुरी, रत्नाकर आगलावे, अवंती पंडित, राखी कळंगूटकर, माधवी गाड, स्वाती सावंत, लक्ष्मी सावंत, प्रथमेश पडवळ, राजू देसाई, बाळू सावंत, म. गो. सावंत आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.