आज रुद्राभिषेक-होमचे आयोजन : उद्या कळसारोहण-महाप्रसाद
वार्ताहर /सांबरा
बसरीकट्टी (ता. बेळगाव) येथे ग्रामस्थ व देणगीदारांच्या सहकार्यातून श्री महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. महालक्ष्मी मंदिराच्या लोकार्पण सोहळय़ाला सोमवार दिनांक 30 पासून प्रारंभ
झाला.
यानिमित्त सोमवारी गावातून कलश मिरवणूक काढण्यात आली. कलश मिरवणुकीत भंडाऱयाची उधळण करत भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी श्री महालक्ष्मी देवीचा जयजयकार करण्यात येत
होता.
गावातील सर्व गल्ल्यांमधून मिरवणूक काढण्यात आली. मंगळवार दिनांक 31 रोजी सकाळी 8 वाजता रुद्राभिषेक व होमचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी एकनंतर ओटी भरण्यास प्रारंभ करण्यात येणार आहे.
बुधवार दि. 1 जून रोजी सकाळी 7 वाजता गंगा कळस पूजन होईल. 10 वाजता गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका, नंदी, कुलदेवता व ग्रामदेवता पूजन होईल. दुपारी 1 वाजता कळसारोहण झाल्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ होणार आहे.
भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी कळविले आहे.