कुदेमनी फाटय़ाजवळ रस्त्यावर गुडघाभर पाणी : दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा
कुदेमनी / वार्ताहर
बेळगाव तालुक्मयाच्या पश्चिम भागामध्ये गुरुवारी दमदार पाऊस कोसळला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसाने बेळगाव-वेंगुर्ला रस्ता काहीवेळ बंद केला होता. कुदेमनी फाटय़ाजवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक काहीकाळ बंद झाली. यामुळे दोन्ही बाजूला वाहनचालक ताटकळून होते. पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
गुरुवारी दुपारी 4 नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाला इतका जोर होता की बघताबघता सर्वत्र पाणीच पाणी झाले. कुदेमनी फाटय़ाजवळील ओढय़ात कुदेमनी, शिनोळी परिसरातील शिवारातून पाण्याचा प्रवाह मोठा प्रमाणात आला. त्या ओढय़ामधून पाणी पुढे जात नसल्यामुळे पुलावर मोठय़ा प्रमाणात पाणी साचून राहिले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती.
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर पाणी आल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वाहनचालक धोका पत्करून त्यामधून वाहने चालवत होते. मात्र काहीजण पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करत होते. अचानकपणे कोसळलेल्या दमदार पावसामुळे साऱयांचीच तारांबळ उडाली होती. बेळगाव आणि चंदगडला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे नेहमीच वाहतुकीची मोठी वर्दळ असते. मात्र या पावसामुळे सर्वांनाच फटका बसला. पाणी कमी झाल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली.