बेळगाव : भोपाळ येथे होणाऱ्या पाचव्या खेलो इंडिया अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी सेंट पॉल्स हायस्कूलचा विद्यार्थी भूषण सुनील पाटील याची कर्नाटक अॅथलेटिक्स संघात निवड झाली आहे. भोपाळसाठी भूषण रवाना झाला आहे. भोपाळ येथील तात्या टोपे स्टेडियमवर 31 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या
अॅथलेटिक्स स्पर्धेत भूषण पाटील याची कर्नाटक संघात निवड झाली आहे. 110 मीटर अडथळा शर्यत व 4×100 मीटर रिले स्पर्धेत तो भाग घेणार आहे. त्याला डायनॅमिक क्लबमध्ये बहुमोल मार्गदर्शन मिळत असून प्रशिक्षक उमेश बेळगुंदकर, सूरज पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर वडील सुनील पाटील, आई सुनीता पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.