आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी
हलगी, रण वाद्यांच्या गजरात व शेकडो कुस्ती शौकीनांच्या उपस्थितीत दावणगिरी येथील डबल केसरी कार्तिक काटे याने दिल्ली येथील निर्मल सिंग याला चौदाव्या मिनिटाला एकलंगी डावावर अधिक गुण मिळवून बीजगर्णी कुस्ती मैदान जिंकले. महाशिवरात्रीनिमित्त बीजगर्णी येथे कलमेश्वर फार्मर्स प्रोसेसिंग सोसायटी यांच्या वतीने रविवारी सायंकाळी बीजगर्णी मंदिर जवळील शेत शिवारातील आखाडय़ात भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकची कुस्ती कार्तिक काटे विरुद्ध निर्मल सिंग यांच्यात माजी महापौर शिवाजी सुंठकर, मोनाप्पा भास्कळ, माजी एपीएमसी सदस्य निंगाप्पा जाधव, ग्रामस्थ कमिटीचे चेअरमन यल्लाप्पा बेळगावकर, पुंडलिक पावशे व भास्कळ बंधू यांच्या वतीने लावण्यात आली. दोन्ही पैलवानांनी एकमेकांच्या ताकतीचा अंदाज घेत कुस्तीला प्रारंभ केला . कुस्तीच्या सुरुवातीलाच एकेरी पट उपसत कार्तिकने निर्मल सिंग याला चित्रपट करण्याचा प्रयत्न केला. मात्र यातून निर्मल सिंग यांने सुटका करून घेऊ घेत कार्तिक वर कब्जा केला. ही पहिल्या नंबरची कुस्ती आखाडय़ात अतिशय रंगतदार अशी सुरू होती. कुस्तीच्या तिस्रया मिनिटाला पुन्हा कार्तिकने एक लांगी डाव साधण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पैलवान एकमेकांवर आक्रमक अशी लढत घेत होते. कार्तिक काटे याने निर्मलच्या एका पायाला मजबूत पकड धरली होती. यातून सुटका करून घेण्याचा निर्मल अधिक प्रयत्न करीत होता. या लढतीत निर्मल सिंग यांच्या एका पायाला दुखापत झाली. यामुळे गुणांवरती व एक लांगी डावावर कार्तिक काटे याला विजय घोषित करण्यात आले. या कुस्तीसाठी पंच म्हणून हनुमंत गुरव व लक्ष्मण बामणे यांनी काम पाहिले. कर्नाटक चॅम्पियन शिवा दड्डी विरुद्ध मध्य प्रदेश येथील प्रदीप ठाकूर यांच्यात दुस्रया क्रमांकाची लढत झाली. ही कुस्ती खानापूर कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकायांच्या हस्ते लावण्यात आली. आखाडय़ातील दुस्रया नंबरची ही कुस्ती सर्वाधिक रंगतदार ठरली. दोन्ही पैलवान एकमेकांवर आक्रमक अशी झेप घेत होते. प्रदीपने चौथ्या मिनिटाला घुटना डावावर शिवाला चित्रपट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवाने आकडी लावण्याचा प्रयत्न केला. अखेर सहाव्या मिनिटावर प्रदीप ठाकूर यांने घिसा डावावरती शिवा दड्डी याला चितपट करून उपस्थितांची वाहवा मिळवली. पंच म्हणून ज्योतिबा चांदीलकर यांनी काम पाहिले.
सौरभ पाटील राशिवडे व महेश लंगोटी यांच्यात झालेली तिस्रया नंबरची कुस्ती 25 मिनिटे आखाडय़ात रंगली. अखेर ही कुस्ती पंचांनी बरोबरीत सोडविण्यात आली. आखाडय़ातील महत्त्वाची चौथ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन कारवे येथील कीर्ती कुमार विरुद्ध विक्रम शिनोळी यांच्यात लावण्यात आली. ही कुस्ती वडगाव ग्रामीण पोलिसांच्या हस्ते लावण्यात आली. अवघ्या तिस्रया मिनिटांवर छडी टांगेवर कीर्ती कुमार यांने विक्रम याला चित्रपट करून विजय मिळविला. पाचव्या क्रमांकाच्या कुस्ती कंग्राळीच्या रोहित पाटील याने कोल्हापुर येथील अवधूत चिंचणे याला चौथ्या मिनिटावर एकेरी कस भरत, एक लांगी डावावर पराभूत केले. ही कुस्ती मल्लविद्या आश्रयदाते पिरणवाडी येथील सतीश पाटील व इतरांच्या हस्ते लावण्यात आली. सुनील बेटगिरी व संभाजी परमोजी यांच्यात झालेल्या सहाव्या नंबरच्या कुस्तीमध्ये सुनील बेटेगिरी हे विजयी झाले. तसेच राजू शिरोळी याने ओमकार मुतगा यांच्यात झालेल्या सातव्या नंबरच्या कुस्तीमध्ये राजू शिरोळे हे विजयी ठरले.. याचबरोबर शिवम मुतगा व कार्तिक जाधव निटूर यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये शिवम याने डाग डावावर कार्तिक याला चित्रपट केले. तसेच पार्थ कंग्राळी व कुलदीप राशीवडे यांच्यात झालेली महत्त्वाची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. संभाजी धोत्रे विरुद्ध सुरज कडोली यांच्यात झालेल्या दहाव्या नंबरच्या कुस्तीमध्ये संभाजी धोत्रे याला गुणांवरती विजयी घोषित करण्यात आले. ओमकार राशिवडे व अविनाश राशिवडे यांच्यात झालेली कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. महेश तीर्थकुंडे याने उमेश जाधव याला छडी टांग डावावर चित्तपट करून विजय मिळविला.
य् ााचबरोबर विक्रम तुर्केवाडी, सिद्धार्थ काकती, समीर रणकुंडये, सुमित बिरजे, स्वरूप जाधव, रवळनाथ कावळेवाडी, श्रेयश पाटील, राहुल डुकरे, पंकज पाटील चापगाव या पैलवानांनी आपापल्या प्रति स्पर्धी पैलवानांवर विविध प्रकारचे डाव खेळून विजय प्राप्त केला. कुस्ती आखाडय़ाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोनाप्पा भास्कर हे होते. आखाडय़ाचे उद्घाटन हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मनोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भगव्या ध्वजाची पूजन महेश रेडेकर व संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गोपाळ भास्कर, एडवोकेट प्रभू यंत्तनटी, एडवोकेट एम बी जिरले, एडवोकेट नामदेव मोरे आदींच्या हस्ते विविध देवदेवतांचे पूजन करण्यात आले. भाजपा ग्रामीणचे माजी अध्यक्ष विनय कदम, अमोल जाधव, नारायण झंगरूचे, सुभाष पाटील,, वसंत पावले, राजेश पाटील आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या कुस्ती उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रितेश जाधव यांनी केले. आखाडय़ातील पंच म्हणून शिवाजी मंडोळकर, बाबू पाटील, शट्टूपा बेळळवटी ,परशराम तुडये, परशराम डागेकर, पांडू पाटील, महादेव पाखरे ,भरमा मोरे, रवळू बेळगुंदी यांनी काम पाहिले. कुस्त्या पाहण्यासाठी बीजगर्णीसह पश्चिम भागातील कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.