वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मुख्य मॅक्रो डाटाच्या प्रकाशनाच्या अगोदर, क्रिप्टो मार्केटमध्ये मंगळवारी तेजीचा कल दिसून आला. ज्यामध्ये बहुतेक क्रिप्टो टोकन्सचा व्यापार जास्त होता. बिटकॉईन जगातील सर्वात मोठे क्रिप्टो टोकन 0.31 टक्क्यांच्या वाढीसह 26,012 डॉलरवर व्यापार करत होते. त्याच दरम्यान इथेरियममध्ये 1,650 डॉलरमध्ये काहीसा खालच्या पातळीवर व्यापार राहिला होता. यावेळी ग्लोबल क्रिप्टोकरन्सी बाजारमूल्यामध्ये तेजीची उसळी राहिली. मागील 24 तासांमध्ये ग्लोबल क्रिप्टो बाजारमूल्य 0.40 टक्क्यांनी वधारुन 1.05 लाख कोटी डॉलरच्या घरात पोहोचले आहे.
कॉईन डीसीएक्सच्या रिसर्च टीमने म्हटले आहे की, विकेंडमध्ये क्रिप्टो बाजारामध्ये एक प्रकारची स्थिरता दिसून आली आहे. टोटल मार्केट कॅपिटल जवळपास 1.05 लाख कोटी डॉलरच्या जवळपास राहिले आहे. अन्य क्रिप्टो टोकनचे भाव हे वधारले आहेत.