सप्टेंबर महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 1, 2 स 10.15 प, 3, 4, 5 स 08.59 प, 6 स 09.19 नं, 7, 8, 10, 11, 16, 17, 18, 20 दु 2.57 नं, 21 दु 3.34 प, 23, 24, 26, 27, 28 सायं 7 प, 29, 30
2 अशुभ दिवस 9, 12, 13, 14, 15, 19, 22, 25
3 सण/ उत्सव/ विशेष तिथी 3- संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्रौ 09.23), 5-मंगळागौर पूजन, 6- श्रीकृष्ण जन्माष्टमी, 7-गोपाल काला, 10-अजाएकादशी, 12-मंगळागौर पूजन, 19- गणेश चतुर्थी, 20- ऋषिपंचमी, 21- ज्येष्ठा गौरी आवाहन, 22-ज्येष्ठा गौरी पूजन, 23-ज्येष्ठा गौरी विसर्जन, 25- भागवत/स्मार्थ एकादशी, 28- अनंत चतुर्दशी, ईद-ए-मिलाद, 29- महालय( महाळ) प्रारंभ
4 अमावस्या/ पौर्णिमा अमावस्या: 13-09-2023 उत्तर रात्रौ 04.48 ते 15-09-2023 सकाळी 09.15 पर्येंत ।। पौर्णिमा: 28-09-2023 सायंकाळी 06.49 ते 29-09-2023 दुपारी 03.17 पर्येंत
5 साखरपुड्याचे मुहुर्त 1 दु 3 नं, 3, 6, 7- दु 4 नं, 16, 17, 20 दु 3 नं, 21 दु 4 प, 23 दु 3 प, 24 दु 2 नं, 26 रात्रौ 08.12 प.
6 बारसे (नाव ठेवण्या चे) मुहुर्त 1 दु 3 नं, 3, 6 दु 4 प, 7 दु 4 प, 10, 11, 17, 24 दु 2 नं, 26, 27
7 जावळाचे मुहुर्त 3, 4 स 9 प, 7 स 10 नं, 8 दु 12 प, 10,11, 17, 27
8 भूमिपुजनाचे/ पायाभरणी चे मुहुर्त 1 दु 1.09 प, 2 स 09.21 प, 4 सायं 4 प, 6 स 09.19 ते दु 4 प, 7 दु 4 प
9 गृहप्रवेशाचे मुहुर्त (व्यवहारीक मुहुर्त) 2 स 10 प, 6 स 9 नं, 7, 10, 11, 16, 17, 18 दु 1 प, 21, 23 दु 12 प, 27
10 वास्तूशांती चे मुहुर्त(व्यवहारीक) 2, 4, 6, 7, 11
11 व्यापार सुऊ करण्याचे मुहुर्त 2 स 9 प, 6 स 09.30 नं, 7 स 10.15 प, 8 दु 12 प, 20, 24 दु 2 ते सायं 06.30 प, 29 दु 3.30 प, 30 दु 4 प
12 वाहन खरेदी चे मुहुर्त 6, 7, 10, 17, 18, 20, 21, 25, 27, 29
13 शेत जमीन/जागा/ प्रॉपर्टी/ फ्लॅट खरेदी साठीचे मुहुर्त 9, 10, 14, 19, 20, 21, 28,29, 30
14 शेती च्या कामां साठी उपयुक्त दिवस 2 स 09.15 प, 3, 8 दु 12 प, 20 दु 3 नं, 24 दु 2 ते सायं 6.30 प, 26, 27, 29 दु 3.30 प, 30 दु 4 प
15 डोहाळे मुहुर्त 3 स 11 नं, 17 स 10 प, 20 दु 3 नं, 21 दु 4 प, 26 स 10 प
16 पंचक (पंचकाचा उत्तरार्ध) 01-09-2023 शुक्रवार दु 02.56 (उत्तरा भाद्रपदा) ते 03-09-2023 रवीवार सकाळी 10.39 (रेवती) ।। 26-09-2023 (मंगळवार) रात्रौ 08.26 ते 30-09-2023 (शनिवार) रात्रौ 09.08 पर्येंत
मेष
आर्थिक दृष्टीने हा येणारा काळ हा स्वप्नपूर्तीचा काळ असू शकतो. मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होण्याची शक्मयता आहे. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. घरातील पूर्वी असलेले कलह कमी होतील. आप्तस्वकीयां बरोबर प्रवासाला जाऊ शकता. शेअर बाजारात गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला मानहानी चे प्रसंग येतील.
उपाय – काजळ दान द्यावे.
वृषभ
या काळात तुमचे सगळे लक्ष व्यवसाय वृद्धीकडे आणि कामाच्या पूर्ततेकडे असेल. तुम्ही इतरांना केलेल्या मदतीचा परतावा तुमच्या मानसन्मानाने होईल. धनप्राप्ती च्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. प्रवास शक्मयतो टाळा. जमिनीच्या व्यवहारात हवे तसे यश मिळणे कठीण दिसते. छोटा गुंतवणुकीतून फायदा आणि प्रेम प्रसंगात यश प्राप्त होईल.
उपाय – चंदनाचे अत्तर लावा
मिथुन
रोजच्या दैनंदिन कामात सुद्धा थोडा बहुत संघर्षाचा का ळ दिसतो आहे. व्यवहारात यश मिळेल. भावंडांच्या सहकार्याने काही कामे सहजतेने पूर्ण होतील. शेजारी असलेल्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. घरापासून दूर जाण्याचे योग आहेत. छोट्या गुंतवणुकीतून चांगल्या नफ्याची शक्मयता आहे.
उपाय – लाजाळूची पाच पाने जवळ ठेवावी
कर्क
आरोग्यम् धनसंपदा हे वाक्मय ध्यानी असू द्या. दुसऱ्या करता इतकी काळजी करत असताना स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष न देणे महागात पडू शकते. पैशाच्या बाबतीत थोडा कठीण काळ आहे पण पुढील ग्रहयोग बघता काळजी करण्याचे कारण नाही. प्रॉपर्टीच्या बाबतीत परिस्थितीत सुधारणा होईल. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे.
उपाय – महादेवाच्या मंदिरात तांदूळ व व्हावे
सिंह
सध्याचा काळ हा गरम डोक्मयाने विचार करण्याचा नसून आपल्या तब्येतीकडे लक्ष देऊन सगळ्या गोष्टींना नीट समजून घेण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी काही व्यक्ती, विशेषत: स्त्री वर्ग अडचणी निर्माण करू शकतात. पैशांच्या बाबतीत काळजी करू नका. प्रवास घडेल. प्रेम संबंध सुधारतील. मनोरंजनाकरता खर्च होईल.
उपाय – आंबट गोड मिठाई वाटावी
कन्या
सहज सुंदर आणि विनोद प्रिय स्वभाव असला तरी या काळात कारण नसताना चिडचिड होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जोडीदाराला तब्येतीचा त्रास जाणवू शकतो. कुटुंबात कधी नाही ते एखाद्या विषयावरती एकमत होईल. प्रॉपर्टीच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल काळ आहे संधी गमावू नका. तीर्थक्षेत्राला भेट द्याल.
उपाय – पवित्र नदीचे पाणी घरी ठेवा
तुळ
आरोग्याच्या बाबतीत एखादी वैद्यकीय चाचणी करावी लागू शकते, पण त्याचे रिझल्ट चांगले आल्यामुळे टेन्शन कमी होईल. एखाद्याला पूर्वी दिलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबातील व्यक्तींना मदत करावी लागेल. प्रवासाचे प्लॅनिंग कराल. जमिनीचे व्यवहार करणाऱ्यांनी थोडा धीर धरावा. अपघातापासून सावध राहावे.
उपाय – रुद्राभिषेक करावा
वृश्चिक
व्यावसायिकांना धनप्राप्तीच्या अनेक संधी प्राप्त होतील असे ग्रहमान आहे. कामानिमित्त प्रवास घडू शकतो. तब्येतीच्या तक्रारी कमी होतील. भावंडांची साथ म्हणावी तशी मिळणार नाही. प्रॉपर्टी संबंधी चिंता वाटू शकते. नोकरदार वर्गाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुकाची अपेक्षा करायला हरकत नाही.
उपाय – शिवलिंगावर साखर अर्पण करावी
धनु
तुमच्या शारीरिक तक्रारीत बद्दल असलेल्या चिंतेमुळेच समस्या जास्त वाढण्याची शक्मयता आहे, त्यामुळे थोडे बिनधास्त राहायला हरकत नाही. कौटुंबिक वादविवाद हे प्रत्येक घरी असतात हे समजून घ्या, त्यामुळे त्रास करून घेण्याची गरज नाही. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळू शकते.
उपाय – गाईला वैरण घालावे
मकर
हल्ली हल्ली तब्येत जरा सुधारत असेल तर आरोग्याची विशेष काळजी घ्या. पैसे येतील पण त्याचबरोबर खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते. कागदपत्रे व्यवहारांमध्ये चालाकिनी मार्ग काढाल. जमिनीच्या व्यवहारात यश प्राप्त होईल. प्रेमींना एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवायला मिळेल. नोकरीत फायदा असेल.
उपाय- देवीला लाल फुल वहावे
कुंभ
तब्येतीच्या छोट्या मोठ्या तक्रारी उद्भवू शकतात, पण खास काळजी करण्याचे काही कारण नाही. समाधानकारक उत्पन्न आणि कौटुंबिक आनंद यांची प्राप्ती होईल. जवळच्या माणसांबरोबर एखाद्या ठिकाणी पिकनिकला जायचा योग बनेल. वैवाहिक जोडीदाराबरोबर काही बाबतीत मतभेद होण्याची शक्मयता आहे.
उपाय- विहिरीत नाणे टाकावे
मीन
मागच्या काही दिवसांच्या मानाने आता तब्येत चांगली असेल. आर्थिक उन्नतीचे मार्ग खुले होतील. कुटुंबातील व्यक्ती सहकार्य करतील. कागदपत्रांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. लहान भावंडांकडून शुभकार्य घडू शकते. प्रॉपर्टी चे मॅटर आशादायक असतील. शेअर बाजारात गुंतवल्यास नुकसान होईल.
उपाय- देवळात फळ दान द्यावे