नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बिहार आणि ओडिशा विधानसभा पोटनिवडणुकांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कुसुम देवी यांना बिहारमधील गोपालगंजमधून तर सोनम देवी यांना मोकामा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ओडिशाच्या धामनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपने सूर्यवंशी सूरज यांना उमेदवारी दिली आहे. 3 नोव्हेंबर रोजी देशातील 7 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होत आहे. या जागांसाठी 14 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. 6 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. पोटनिवडणूक होणाऱया सहा राज्यांमध्ये महाराष्ट्रातील अंधेरी-पूर्व मतदारसंघाचाही समावेश आहे.